चिखलीपाड्यातील मेणबत्ती कारखान्यात स्फोट : जखमी महिलेची उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
मृतांचा आकडा पोहोचला पाचवर : राज्य शासनातर्फे मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
Explosion in candle factory in Chikhalipada : Malvali Pranjyot during treatment of injured woman निजामपूर : जवळच असलेल्या चिखलीपाडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळल्याने चौघा महिलांचा जागीच मृत्यू ओढवला होता तर मंगळवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान संगीता प्रमोद चव्हाण यांचीही प्राणज्योत मालवली.
मृतांचा आकडा पाचवर
पुन्हा एका महिलेची प्राणज्योत मालवल्याने मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या घटनेप्रकरणी मेणबत्ती कारखान्याचे मालक जगन्नाथ रघुनाथ कुंवर (वासखेडी) यांच्याविरोधात निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या घटनेत माय-लेकींसह पाच महिलांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.