प्रवाशांना दिलासा : कानपूर-मुंबई, झॉशी-पुणे, पटना-पुणे रेल्वे गाड्या होणार सुरू


 

भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेतर्फे कानपूर-मुंबई व झॉशी-पुणे या दोन गाड्या सुरू करण्यात येत आहे. कानपूर – मुंबई ही विशेष गाडी (04151) अप ही गाडी दर शनिवार, 18 जानेवारी ते 28 मार्चपर्यत चालविली जाणार आहे. या गाडीच्या 11 फेर्‍या होणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांची जागेची सोय होणार आहे. कानपूर येथून ही गाडी दुपारी एकला सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 3.20 वाजता मुंबईत पोहोचेल. तर डाऊन 04152 मुंबई-कानपूर विशेष गाडी दर रविवार, 19 जानेवारीला मुंबई येथून दुपारी 4.40 वाजता सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी रात्री 8.30 वाजता कानपूरला ही गाडी पाहोचेल. ही गाडी फतेहपूर, अलाहाबाद, शंकरगढ़, माणिकपूर, सतना, कटनी, जबलपुर, पिपरीया, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण येथे थांबणार आहे. या गाडीला एक एसी-2, एक एसी 3, 10 आरक्षित तर चार जनरल डबे असतील.

झॉशी-पुणे विशेष गाडी
पुण्याला जाणार्‍या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून झॉशी-पुणे ही विशेष गाडी 22 जानेवारी ते 25 मार्चपर्यत चालविली जाणार आहे. अप 04188 झॉशी पुणे विशेष गाडी बुधवार, 22 22 रोजी झॉशी येथून सकाळी 10.20 वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी 9.20 वाजता पुण्यात पोहोचेल तर डाऊन 04187 पुणे -झॉशी विशेष गाडी गुरूवार, 23 जानेवारी ते 26 मार्च दरम्यान चालणार आहे. गुरुवारी दुपारी 3.15 वाजता पुणे येथून सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता झॉशीला पोचेल. ही गाडी बबीना, ललितपुू, बिना, गंजबसोदा, बिदिशा, भोपाल, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, नगर, दौंड येथे थांबणार आहे. या गाडीला एक एसी -2, दोन एसी-3, चार आरक्षित आणि सहा जनरल डबे असतील.

पटना-पुणे दरम्यान विशेष गाडी
रेल्वे गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने पटना-पुणे दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आठ फेर्‍या करणार आहे. अप 03253 पटना पुणे विशेष गाडी 6 फेब्रुवारी ते 26 मार्च या काळात चालविली जाणार आहे. दर गुरूवारी सकाळी नऊ वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी 4.15 वाजता पुण्यात पोहोचेल. 03254 डाऊन पुणे-पटना विशेष गाडी 7 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात चालविली जाणार आहे. ही गाडी सायंकाळी 7.30 वाजता सुटणार आहे. रविवारी पहाटे 3.30 वाजता पटण्याला पोहोचेल. आरा, बक्सर, पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन, अलाहबाद छोइकी, मानिकपूर, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळ, दौंड येथे थांबणार आहे. या गाडीला आठ आरक्षित तर 12 एसी 3 डबे असतील.


कॉपी करू नका.