चोपडा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याचा निर्णय
चोपडा : शेतकरी, कामगारांचे पैसे थकल्याने चहार्डी येथील सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने तो भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मंगळवार, 13 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यावेळी ऊस उत्पादक शेतकर्यांचे थकीत पैसे व कामगारांचे थकीत पगार देण्याच्या अटीवर व भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आधीच्या कामगारांना कायम ठेवण्याच्या अटीवर चोसाका भाडेतत्त्वार देण्याचा ठराव शेतकरी सभासदांनी मंजूर केला. सर्वसाधारण सभा 13 रोजी दुपारी 1 वाजता चहार्डी येथील कारखाना साईटवर चेअरमन अतुल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील, माजी चेअरमन डॉ.सुरेश पाटील, अॅड.घनश्याम पाटील, पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी उपस्थित होते.