धुळे पंचायत समितीतील लाचखोर कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
Dhule Panchayat Samiti bribe-taking junior assistant in ACB’s net धुळे : धुळे पंचायत समितीतील शाखा अभियंत्याकडेच लेखा परीक्षण काम झाल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून साडेतीन हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक श्यामकांत नानाभाऊ सोनवणे (52, धुळे) यास धुळे एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी तीन वाजेच्या पंचायत समितीतील दालनातच लाच स्वीकारताना अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.
लाचखोरीत गाठला कळस
पंचायत समितीत कार्यरत शाखा अभियंता एप्रिल 2022 पर्यंत रत्नपूरा बीट येथे कार्यरत होते. या बीटचे विभागीय लेखा परीक्षण (ऑडीट) झाल्यानंतर बक्षीस म्हहणून संशयित नानाभाऊ सोनवणे साडेतीन हजारांची लाच सुमारे आठ महिन्यांपासून वेळोवेळी प्रत्यक्ष भेटीत व फोनवर मागत होते. या प्रकरणी तक्रारदाराने सोमवारी धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. बांधकाम विभागातील सोनवणे यांच्या दालनातच त्यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच पंचांसमक्ष सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.