जामनपाणीच्या अल्पवयीन तरुणीची गळफास घेत आत्महत्या


A minor girl of Jamanpani committed suicide by hanging herself शिरपूर : अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना
शिरपूर तालुक्यातील जामनपाणी पोस्ट बोराडी येथे रविवारी सायंकाळी घडली. सहाबाई निमड्या पावरा (14) असे आत्महत्या करणार्‍या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सहाबाई हिने राहत्या घरी छताच्या लाकडाला दोरीने गळफास घेतला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आत्महत्या केल्याची घटना लक्षात येताच तिचे काका परशुराम सीताराम पावरा यांनी खाजगी वाहनाने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात रविवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !