दोंडाईचा शहर खुनाने हादरले : मध्यप्रदेशातील आचार्याची निर्घृण हत्या
Dondaiycha town rocked by murder: Acharya brutally murdered in Madhya Pradesh दोंडाईचा : दोंडाईचा नंदुरबार-रस्त्यावरील हॉटेल पुष्पामध्ये काम करणार्या मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या आचार्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी मध्यराात्री घडली असून या घटनेत नरेश लालचंद शाहू (वय 54) यांचा मृत्यू ओढवला. खून प्रकरणी हॉटेलमधीलच दोघांवर संशय असून ते पसार झाले आहेत.
पैशांच्या वादातून हत्येचा संशय
नरेश लालचंद शाहू गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेलमध्ये कार्यरत होता. रात्री आचारीचे काम केल्यानंतर मयत हा हॉटेलात झोपत होता. रविवारी मध्यरात्री नरेश शाहू यास कोणीतरी अज्ञाताने चाकूने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी दोंडाईचा पोलीस निरीक्षक केवलसिंग पावरा व सहकार्यांनी धाव घेत घटनास्थळावरून दोन चाकू जप्त केले. दरम्यान, आचारी नरेश याच्या खुनाचे कारण अद्याप अस्षष्ट असलेतरी हॉटेलमध्ये काम करणार्या दोन सहकार्यांवर पोलिसांना संशय असून ते पसार झाल्याने त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचाही प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.