जळगावच्या युवकाचा सुरतमध्ये चाकूने भोसकून खून
जळगाव : शहरातील शिवाजी नगर परीसरातील रीतेश सोमनाथ शिंपी (वय 20, रा. खडकेचाळ) या युवकावर सुरतमधील नवागाम डिंडोलीत चाकूने हल्ला करण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना या तरुणाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेने शिवाजी नगर भागात शोककळा पसरली आहे. सोमवारी कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीत दुपारी नाचत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांनी रीतेशवर हल्ला केल्याची माहिती असून प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी डिंडोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत रीतेशच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परीवार आहे.