भुसावळात शॉर्ट सर्किटने घेतला परभणीतील तरुणाचा बळी

सहकारी बचावला : गवळीवाड्यातील दुर्घटना


A short circuit killed a young man from Parbhani in Bhusawal भुसावळ : शहरातील गवळीवाडा भागातील हनुमान मंदिराजवळ वीज डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या दोन तरुणांना जबर धक्का बसल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गवळीवाडा भागात मोठी खळबळ उडाली. संतोष पंडित भस्के (26, रा.वाडी खुर्द, तहसील पालम, जि.परभणी, ह.मु.भुसावळ) असे मयत मजूराचे नाव आहे तर महादू सुभाषराव कंचटे (22, मिर, ता.लोहार, ता.नांदेड) असे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गावाहून आला अन जिवाला मुका
गवळीवाड्यातील हनुमान मंदिराचे बांधकाम सुरू असून त्यासाठी परभणीसह अन्य जिल्ह्यातील मजूर आले आहेत. संतोष बसके हा तरुणदेखील सोमवारीच गावावरून परतला होता व बुधवारी नियमितपणे मंदिराला प्लॅस्टरचे काम करण्यात येणार होते त्यासाठी मंगळवारी मंदिरात साफसफाईचे काम झाल्यानंतर संतोषसह महादू हे उभे असतानाच विद्युत डीपीत शॉर्टसर्किट होवून त्याचा धक्का दोघांना बसल्याने दोघे जमिनीवर फेकले गेले. माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर व स्थानिकांनी दोघांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवले असता संतोष बसके यास मृत घोषित करण्यात आले तर महादू याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास घरी सोडण्यात आले. या घटनेप्रकरणी रीदम हॉस्पीटलचे डॉ.सतीश कट्टीपट्टी यांनी शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी मृतदेह मूळ गावाी रवाना करण्यात आला. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडिल व मोठा भाऊ असा परीवार आहे. तपास उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.



इलेक्ट्रीक डीपीबाबत तक्रारींना टोपली
गवळीवाडा भागातील शॉर्ट सर्किट झालेल्या डीपीवर यापूर्वी अनेकदा शॉर्ट सर्किट झाल्याचे प्रकार घडल्यानंतर माजी नगरसेवक नाटकर यांच्यासह स्थानिकांनी वीज कंपनीकडे तक्रार केल्या मात्र वीज कंपनीकडून या तक्रारींना केराची टोपली दर्शवण्यात आली. वेळीच दखल घेतली असतीतर तरुणाचे प्राण वाचले असते, अशी भावना नागरीकांनी व्यक्त केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !