बुलेट अपघातात जामनेरातील दोघे युवक ठार : अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा


Two youths killed in Jamner bullet accident : Crime against unknown driver मुक्ताईनगर : अज्ञात भरधाव वाहनाने बुलेटला जबर धडक दिल्याने जामनेर तालुक्यातील कापूसवाडी गावातील दोघे युवक जागीच ठार झाले. हा अपघात मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव उड्डाण पुलाजवळ रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. अपघाताला कारणीभूत असलेला वाहन चालक अपघात घडताच वाहनासह पसार झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू
जामनेर तालुक्यातील कापूसवाडी गावातील पृथ्वीराज पदमसिंग चव्हाण (33) व सागर बाबूराव हामरे (25, कापूसवाडी, ता.जामनेर) हे दोघे तरुण बुलेट (एम.एच.19 सी.एस.6968) वरून जात असताना रविवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने बुलेटला जबर धडक दिल्याने दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.



अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आले. या संदर्भात चरणसिंग सावजी चव्हाण (कापूसवाडी, ता.जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विजय पढार करीत आहेत.

नातेवाईकांच्या लग्नाला जात असताना अपघात
शेती काम करणारा पृथ्वीराज हा तरुण मित्र सागरसोबत बुलेटवरून मुक्ताईनगर येथे नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी निघाला होता मात्र रस्त्यात क्रुर काळाने त्याच्यावर घाला घातल्याने दोघा तरुणांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सोमवारी दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत पृथ्वीराजच्याा पश्चात आई, वडिल, पत्नी व भावेश व दुर्गेश अशी दोन मुले आहेत तर मयत सागर याच्या पश्चात आई-वडिल, भाऊ व वहिनी असा परीवार आहे. दोघा तरुणांच्या अपघाती मृत्यूने कापूसवाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !