Karnataka Election Result 2023 कर्नाटकात भाजपाचे पानीपत : काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल


BJP’s Panipat in Karnataka: Congress marches towards majority नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये सरळ लढत होती. निवडणुकीत एकूण दोन हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. विशेष म्हणजे कर्नाटकात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड गेल्या 38 वर्षापासून सुरू असताना आता दुपारपर्यंत आलेल्या निकालानुसार भाजपाचे सत्तेतून पायउतार होण्याचे संकेत असून काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत, भाजपाची सत्ता जाण्याची शक्यता
कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस 119, जेडीएस 25 तर भाजपा 72 जागांवर आघाडीवर आहे तर इतर 8 जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

8 पैकी 5 अपक्ष काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती
कर्नाटकात काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून अपक्ष 8 उमेदवारांपैकी 5 जण काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. आम्हाला सत्तास्थापनेसाठी कुणाची मदत लागणार नाही असं सिद्धरमैय्या म्हणाले होते. परंतु काँग्रेस कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाही.

हा तर खोके सरकारचा पराभव : संजय राऊत
देशाची मन की बात कर्नाटकच्या निकालातून बाहेर पडली. 2024 च्या निवडणुकीत जे कर्नाटकात झाले तेच देशात होईल. कर्नाटकच्या जनतेने खोके सरकारच्या नेत्यांना लाथाडले. राज्यातील मोठी टोळी कर्नाटकात गेली होती. कर्नाटकातील पराभव हा मोदींचा पराभव आहे. आपल्याच लोकांचा पराभव करण्यासाठी पैशांचा वापर खोके सरकारने केला, असा आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

 


कॉपी करू नका.