धुळे शहरातील जवानाची पूलवामात गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट : कुटूंबियांचा मात्र छळवादाचा आरोप


A jawan in Dhule city committed suicide by shooting himself in the pool धुळे : धुळ्यातील मूळ रहिवासी व हल्ली पूलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या जवानाने सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडत आत्महत्या केली. ही घटना बुधवार, 17 रोजी घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

रायफलमधून गोळी झाडत आत्महत्या
योगेश अशोक बिर्‍हाडे (37, रा.आनंद नगर, भोई सोसायटी, धुळे) असे मृत जवानाचे नाव आहे. धुळे शहरातील देवपूर भागातील आनंद नगर, भोई सोसायटी रहिवासी असलेला योगेश बिर्‍हाडे हा जवान 25 जानेवारी 2006 रोजी ते भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. छत्तीसगड, मुंबई (तळोजा) त्यानंतर जम्मू कश्मीर, नांदगाव येथे सेवा केल्यानंतर सध्या त्याची जम्मूकश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात नियुक्ती होती. शहिद जवान योगेश बिर्‍हाडे याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा, एक वर्षाची मुलगी, पत्नी, भाऊ असा परीवार आहे. जवानाचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा धुळ्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे..


कॉपी करू नका.