आता महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करण्याची गरज : आमदार एकनाथराव खडसे


Need to separate Khandesh from Maharashtra now: MLA Eknathrao Khadse जळगाव : जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पाच्या पळवा-पळवीवरून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे आक्रमक झाले असून त्यांनी स्पष्ट शब्दात प्रकल्प पळवण्याचा प्रकार असाच सुरू ठेवत असाल तर महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखेडला नेण्यात आल्यानंतर आता ुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे मंजूर असलेले पशुवैद्यकीय महाविद्यालयही अकोला येथे पळवण्यात आले. यावरुन आमदार खडसे संतप्त झाले आहेत. खडसे कृषीमंत्री असताना जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले प्रकल्पही रखडले आहे.

मग मंत्री काय करताय
खान्देश महाराष्ट्रापासून वेगळा करण्याच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता महाराष्ट्र हा एकसंघच राहिला पाहिजेत. अन्याय होत असल्याने संतापाच्या भरात ते वक्तव्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत दोघेही मंत्री काहीच बोलत नाहीत. मी, मी म्हणणारे मंत्री काय करताहेत. विधानपरिषदेत रखडलेल्या प्रकल्पांबाबत जाब विचारला त्याबाबतही टाळाटाळ करण्यात आली असल्याचे खडसे यांनी सांगितले.

या प्रकल्पांना चालना कधी ?
राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन जळगाव, धुळे, नंदुरबार येथे नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत समितीचा अहवाल प्राप्त आहे मात्र खान्देशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ करण्याबाबत निर्णय नाही. सालबर्डी फ ता.मुक्ताईनगर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 60 एकर जागा देण्यात आली होती. हे महाविद्यालय अकोला येथे पळवण्यात आले. हिंगोणा ता.यावल येथे उती संवर्धन प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहेफ बोदवड तालुक्यातील हिंगणे येथे तूर संशोधन केंद्र, हतनूर येथे मत्स्यबीज प्रकल्प, भुसावळ येथे कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, चाळीसगाव येथे लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र, मंत्री महाजन यांनी घोषणा केलेला जामनेरातील टेक्सटाईल पार्क, सालबर्डी येथे कृषी अवजारे निर्मिती कारखाना मंजूर आहे मात्र या प्रकल्पांचे पुढे काहीही झाले नसल्याचे आमदार खडसे म्हणाले. .हतनूर धरणातील गाळ वाहून जाण्यासाठी वाढीव सात गेटचे बांधकाम गेल्या 15 वर्षात थंड बस्त्यात आहे.

 


कॉपी करू नका.