धुळ्यात गुन्हे शाखेकडून 14 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त : युपीतील चालकास अटक


14 lakhs worth of aromatic tobacco seized by crime branch in Dhule : driver from UP arrested धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे एका कंटेनरमधून 14 लाखांची तंबाखू जप्त केली आहे. सोमवार, 12 रोजी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीने संशय येवू नये म्हणून कंटेनरवर ‘ऑन आर्मी ड्युटी’ असे लिहिले परंतु एलसीबीने वाहनाची तपासणी करीत सुगंधी तंबाखू जप्त करीत आरोपीला अटक केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल न्यू सदानंदजवळ कंटेनर (यु.पी.83 सी.टी.5877) आल्यानंतर पथकाने त्याची झडती घेतली असता लोखंडी चॅनेलच्या आड तंबाखूचा लाखो रुपयांचा साठा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार, 12 जून रोजी करण्यात आली. पोलीस पथकाने एक लाख 80 हजार किंमतीची तंबाखू, दोन 80 हजारांचे लोखंडी चॅनेलचे ट्रे आणि 10 लाखांचे आयशर वाहन असा 13 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी वाहनचालक बबलू रामप्रकाश प्रजापती (27, ईमलियाडांग, बमरारा, ता.चरखारी, जि.महुवा, उत्तरप्रदेश) यास अटक केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, सुनील पाटील, मयूर पाटील, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !