नरडाणा पोलिसांची मोठी कारवाई : साडेसहा लाखांची राज्यात प्रतिबंधीत सुपारी जप्त


Major action of Nardana Police : Betel nuts worth six and a half lakhs seized in the state नरडाणा : नरडाणा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान आयशर वाहनातून साडेसहा लाखांची प्रतिबंधीत सुगंधी स्वीट सुपारी जप्त करीत मध्यप्रदेशातील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोराणे पहाटेनजीक शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चालक महेंद्र बापू दावल (27, मलतार, ता.कसरावद, जि.खरगोन एम.पी.) व हरीष जगदीश मंडलोय (21, डाबरी, मलतार, ता.कसरावद, जि.खरगोन एम.पी.) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दहा लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन (एम.पी.13 सी.बी.2433) व सहा लाख 48 हजार रुपये किंमतीची स्वीट सुपारी जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, मनोज कुंवर, रामनाथ दिवे, सचिन माळी, अहिरे, साळुंखे, अकिल पठाण, भरत चव्हाण, गजेंद्र पावरा, खांडेकर व विजय माळी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !