Fatal accident on Palasner Bypass पळासनेर बायपासवर भीषण अपघात : 9 जण जागीच ठार ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती


Fatal accident on Palasner Bypass : Ten killed on the spot; Death toll feared to rise शिरपूर  : राज्यात अपघातांची मालिका कायम आहे. बुलढाण्यानजीक लक्झरी उलटून व नंतर आग लागून झालेल्या अपघातात 26 प्रवासी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता शिरपूरजवळील पळासनेर बायपासवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटनेरचे अचानक ब्रेक निकामी झाल्यानंतर कंटेनर दोन वाहनांना उडवले व त्यानंतर कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या ग्राहकांसह वेटर व अन्य नागरीक मिळून 9 हून अधिक जणांचा मृत्यू ओढवला. हा भीषण अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. या अपघाताने राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी वेळीच धाव घेत मदत कार्याला सुरूवात केली.

दहा नागरीकाहून अधिक लोक ठार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथून मुंबईच्या दिशेने येणारा 14 चाकी कंटेनरचे अचानक ब्रेक निकामी होताच कंटनेरने रस्त्यावरून येणार्‍या दोन वाहनांना उडवले व नंतर हा कंटेनर एका हॉटेल शिरताच तेथील जेवणासाठी थांबलेले ग्राहक, वेटर अशांना चिरडून हा कंटेनर बाहेर पडल्यानंतरही अनेकांना धडक बसल्याने 9 हून अधिक नागरीक जागीच ठार झाले.

पोलिसांची धाव
अपघाताची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक अंगद आसटकर यांच्यासह पोलिसांनी धाव घेत मदतकार्याला वेग दिला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !