जळगावात चोरी गेलेल्या चीजवस्तू अनेक वर्षानंतर मिळताच तक्रारदार भारावले

जळगावात गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस उपअधीक्षकांच्या उपस्थितीत तक्रारदारांना परत


The complainant was shocked to find the stolen cheese in Jalgaon after many years जळगाव : विविध गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्त झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तो तक्रारदाराला परत केला जातो मात्र चोरी, जबरी चोरी यासह चैन स्नॅचिंग, दुचाकी चोरी आदी गुन्ह्यांमध्ये चोरी झाल्यानंतर तक्रारदार अनेकवेळा आशा सोडून देतात मात्र जळगाव पोलीस दलाने अत्यंत गेल्या कार्यकाळात अत्यंत धाडसी कारवाया करीत अनेक गुन्ह्यांचा उकल करीत आरोपींकडून मुद्देमालाची रीकव्हरी केली. जळगावच्या मंगलम हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. अनेक वर्षानंतर किंमती वस्तू परत मिळाल्यानंतर तक्रारदारही भारावल्याचे चित्र दिसून आले. गहाळ व चोरी झालेले 115 मोबाईल, दोन चोरीच्या दुचाकी आणि चैन स्नॅचिंगमध्ये गेलेली सोन्याचे चैन आदी मुद्देमाल परत करण्यात आला.

पोलीस प्रशासनाने लावला गुन्ह्यांचा छडा
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोबाईल चोरी, दुचाकी आणि मंगळसुत्र लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. वारंवार होत असलेले मोबाईल चोरीसह इतर गुन्ह्यातील संशयितांचा शोध लावण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी कारवाई करत गुन्ह्यांचा उलगडा केला. यातून काही संशयितांना अटकदेखील करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईत एकूण 115 मोबाईल, चोरीला गेलेल्या दोन दुचाकी आणि महिला वकीलांची लांबविलेली सोन्याचे चैन या गुन्ह्याचा छडा लावला होता.



या अधिकार्‍यांची उपस्थिती
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदार आणि मूळ मालक यांना संबंधित मुद्देमाल देण्याचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात मंगलम हॉलमध्ये शुक्रवारी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते देण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !