मुक्ताईनगरात गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : दोघे संशयित मुक्ताईनगर पोलिसांच्या जाळ्यात


Panic in Muktai Nagar on the death of Village Kattya: Two suspects in Muktai Nagar police’s net मुक्ताईनगर : गावठी कट्टा कमरेला लावून दहशत निर्माण करणार्‍या संशयितास कट्टा विक्रेत्याच्या मुक्ताईनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांचा एक साथीदार पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. रवींद्र उर्फ माया तायडे (27, मुक्ताईनगर) असे अटकेतील संशयिताचे नाव असून आरोपीने हा कट्टा युवराज कडू होंडाळे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याने त्यासही अटक करण्यात आली तर संशयितांचा एक साथीदार मयुर विजयसिंग राजपुत (मुक्ताईनगर) हा पसार झाला आहे. संशयिताना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, मोतीलाल बोरसे, प्रशांत चौधरी, पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकुर, हवालदार रवींद्र धनगर आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !