भुसावळातील गुन्हेगार निखील राजपूतची हत्या : अटकेतील शालक निलेश ठाकूरला कोठडी : गुन्ह्यातील चाकू जप्त


Murder of criminal Nikhil Rajput in Bhusawal : Arrested schoolboy Nilesh Thakur in custody: Crime knife seized भुसावळ : भुसावळातील कुविख्यात गुंड निखील राजपूत याची अनैतिक संबंधाताला कंटाळून त्याचा शालक निलेश ठाकूर याने चाकूचे वार करीत रविवारी पहाटे श्रीराम नगरातील पाण्याच्या टाकीवर हत्या केली होती. खून प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी निलेश ठाकूर यास अटक केल्यानंतर रविवारी त्यास न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खूनातील संशयिताकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

बहिणीशी प्रेमविवाहानंतर दुसरीशी घरोबा केल्याचा राग अनावर
पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असलेल्या निखीलने भाग्यशी या तरुणीशी पाच वर्षांपूर्वीच प्रेमविवाह केला मात्र बाहेरील एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध बनवत तिच्यासोबत संसार थाटल्याची बाब निखीलचा शालक निलेश ठाकूर याला खटकत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते व त्यातून शनिवारी मध्यरात्री वादाची ठिणगी पडताच निलेशने भुसावळातील श्रीराम नगरात आलेल्या व पाण्याच्या टाकीवर झोपलेल्या निखीलवर झोपलेल्या अवस्थेत चाकूचे सपासप वार करीत त्याची हत्या केली होती. बाजारपेठ पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. संशयिताला रविवारी न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर गुन्ह्यातील चाकू महामार्गावरील अंडरपासजवळून जप्त करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !