हायप्रोफाईल खटले लढवणारे वकील हरीष साळवे वयाच्या 68 व्या वर्षी लग्नबंधनात


High profile litigation lawyer Harish Salve is married at the age of 68 लंडन : देशातील अनेक हायप्रोफाईल खटले लढवणारे ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे वयाच्या 68 वर्षीय लग्नबंधनात अडकले. मैत्रीण त्रिनासोबत लंडनमध्ये नुकत्याच एका शाही विवाह सोहळ्यात ते बोहल्यावर चढले.नीता अंबानी, ललित मोदी, उज्ज्वला राऊत यांच्यासह काही पाहुणे लग्नाला उपस्थित होते. हरीश साळवे आणि त्रिना यांच्या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हायप्रोफाईल वकील
सलमान खान, कुलभूषण जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या अनेक खटल्यांमध्ये साळवे यांनी वकील म्हणून काम पाहिले असून देशात अत्यंत हायप्रोफाईल वकील म्हणून त्यांची ख्याती आहे. हरीश साळवे यांचा पहिला विवाह मीनाक्षी यांच्यासोबत झाला होता. त्यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत. तीन दशकांहून अधिक काळाच्या संसारानंतर जून 2020 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्याच वर्षी त्यांनी कॅरोलिन ब्रॉसार्डशी हरीश साळवेंनी लग्न केले. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !