बँण्ड साहित्याचे आठ लाखांचे भाडे थकवले : पाच जणांविरोधात गुन्हा


Eight lakh rent paid for band material : Case against five persons जळगाव : बॅण्ड साहित्य भाडे तत्वावर घेतल्यानंतर तब्बल पावणेआठ लाखांचे भाडे थकवल्याप्रकरणी रायपूर येथील पाच जणांविरोधात नशिराबाद पोलिसरात 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
जळगाव तालुक्यातील रायपूर-कंडारी येथील किरण संपत यांचा बॅण्डचा व्यवसाय होता. त्यांचे निधन झाल्यानंतर सदरचे बॅण्ड साहित्य रायपूर येथेच भाडेतत्त्वावर देण्यात आले मात्र जून 2020पासून या बॅण्ड साहित्याचे भाडे मिळत नसल्याने किरण यांच्या कुटुंबीयांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली. भाड्याची ही रक्कम सात लाख 75 हजार रुपयांवर पोहोचल्यानंतर संबंधित दखल घेत नसल्याने मयताचे नातेवाइक रवींद्र दगडू धनगर (32) यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून राजू शेख बाबू पटेल (52), जाकीर शेख युनूस (34), आरीफ शेख युनूस शेख (32), भैया बाबू पटेल (35), ताहीर राजू पटेल (19, सर्व रा. रायपूर, ता. जळगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार रवींद्र तायडे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !