गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूसासह संशयित जाळ्यात : जळगाव शहर पोलिसांची कारवाई

Gavathi pistol, four live cartridges in suspect’s net : Jalgaon city police action जळगाव : गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूस बाळगून दहशत माजविणार्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी टअक केली आहे. ही कारवाई शुक्रवार, 27 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता शहरातील शास्त्री टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिस्टल, काडतूस जप्त
जळगाव शहरातील गेंदलाल मिल परीसरातील संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे (34) हा शहरातील शास्त्री टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर हातात गावठी पिस्टल व चार जीवंत काडतूस घेऊन दहशत निर्माण करीत असल्याचे कळताच नाईक किशोर निकुंभ आणि कॉन्स्टेबल तेजस मराठे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना माहिती कळवली.
शुक्रवार, 27 ऑक्टोबर रोजी पथकाने दुपारी अडीच वाजता कारवाई करत नवजीवन कलेक्शन दुकानासमोरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे याला अटक केली. त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचा गावठी पिस्टल व चार हजार रुपये किंमतीचे चार जिवंत काडतूस असा एकूण 14 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, हवालदार राजकुमार चव्हाण, प्रफुल्ल धांडे, उमेश भांडारकर, संतोष खवले, किशोर निकुंभ, योगेश पाटील, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
