मराठा समाजाचे आमदार-खासदार एकत्र आले तर दोन तासात आरक्षण : चाळीसगावातील सभेत मनोज जरांगे पाटील


Reservation in two hours if MLAs-Khasdars of Maratha community come together : Manoj Jarange Patil in meeting in Chalisgaon  चाळीसगाव : मराठा समाजाचे आमदार-खासदार जरी एकत्र आले तरी दोन तासात समाजाला आरक्षण मिळेल असा दावा रविवारी चाळीसगाव शहरात झालेल्या विराट सभेत मराठा समाजोचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
कुणी कितीही नाही म्हणालं तरी मराठा बांधवांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणारच, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकजुटीमुळे आरक्षण अंतिम टप्प्यात
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमचा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. मराठा समाजामुळे आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्याचे ते म्हणाले. आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पोरांच्या मदतीला धावून या. श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा गोरगरिबांच्या लेकरांकडं मागे वळून एकदा बघा कारण तेच तुम्हाला उद्या तारणार आहेत. गरीबांचे पोर श्रीमंताला तारू शकतात. जर जात संपली तर तुम्हाला उद्या विचारणार सुद्धा नाही. प्रत्येकाच्या घरातल्या लेकराला पाठबळाची गरज आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी प्रचंड ताकतीने उठाव केला पाहिजे. मराठ्यांची पोर संपली तर मराठा समाज संपेल.


मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळेल
मनोज जरांगेनी या वेळी संबोधित करताना पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळांवर टीका केली आहे. मराठ्यांनी त्याला मोठं केलं आणि आज तेच आरक्षण मिळू नये म्हणून उभा राहिला, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली. कोणी कितीही आडवा येऊ द्या मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार, असे जरांगे म्हणाले. आज मराठा समाज चारही बाजूनी घेरला आहे. सरकार आरक्षण सोडून दुसरं काम करत नाही, फक्त आमच्याशी खोट बोलत आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले. एकट्या जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख नोंदी मिळाल्या आहेत. लेकरू कोणाच असलं तरी आपलंच लेकरू मोठं होत आहे हे लक्षात ठेवा. शांततेत आंदोलन करायचा आहे, मराठ्यांच्या लेकराला तळपू देऊ नका. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !