धुळ्यात सरकी व फटाक्यांच्या आड गांजाची वाहतूक उघड : पाच लाखांचा गांजा जप्त

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : चालकाला बेड्या : कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात खळबळ


Trafficking of ganja under the cover of firecrackers and sardines in the dust revealed : Ganja worth five lakhs seized धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील गांजा तस्करी रोखत पाच लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. आबीद हुसैन शेख (शिवाजी नगर, धुळे) अटकेतील संशयिताचे नाव आहे. दरम्यान, ट्रकमध्ये सरकी व फटाके आणून त्याआड गांजा लपवून त्याची तस्करी सुरू असल्याचे दिसून आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना चाळीसगाव रोड चौफुलीवर येणार्‍या ट्रकद्वारे गांजा येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रविवार, 17 रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुलीवर ट्रक (क्र. एम.एच. 18 ए.ए.1268) आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्यात मानवी मेंदूवर विपरीत परीणाम करणारा मादक पदार्थ गांजा असल्याचे दिसून आल्याने ट्रक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आला. पंचांसमक्ष या ट्रकमधून पाच लाख एक हजार 375 रुपयांचा गांजा, तीन लाख 37 हजार 869 रुपये किंमतीची सरकी, अडीच लाख रुपये किंमतीचे फटाके तसेच 12 लाख रुपये किंमतीचा ट्रक मिळून 22 लाख 89 हजार 244 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल गुणवंत पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरेधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक निरीक्षक गणेश फड, प्रकाश पाटील, संजय पाटील, हवालदार संदीप सरग, सुरेश भालेराव, रवीकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोतदार, सुशील शेंडे, सागर शिर्के, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !