योगी सरकारचा मोठा निर्णय : अयोध्या जंक्शन ‘या’ नावाने ओळखले जाणार


Yogi government’s big decision: Ayodhya junction will be known as ‘Ya’ अयोध्या : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची 22 जानेवारी रोजी प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘अयोध्या धाम’ जंक्शन केले आहे. या निर्णयामुळे रामभक्त समाधानी झाले आहेत. अलीकडेच अयोध्या दौर्‍यावर असताना रेल्वे स्थानकाची त्यांनी पाहणी केली.

दौर्‍यापूर्वीच केले नामकरण
उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. याच यादीत आता अयोध्या स्थानकाचेही नाव जोडले गेले आहे. अयोध्या जंक्शनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आणि अयोध्या दिल्ली वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी येत आहेत. त्यांच्या दौर्‍यापूर्वी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !