शिरपूर तालुक्यात उंटांची निर्दयतेने वाहतूक : 49 उंटांची मुक्तता

शिरपूर पोलिसांची कारवाई : गुजरातसह भुजच्या दोघांना बेड्या


Cruel transportation of camels in Shirpur taluka : Liberation of 49 camels शिरपूर : उंटांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक करणार्‍या गुजरातसह भुजमधील दोघांना शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकत सुमारे दहा लाख रुपये किंमतीच्या 49 उंटांची मुक्तता केली आहे. या उंटांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे तर उंटांची गो शाळेत रवानगी करण्यात आली. भोजाबाई कानाभाई रबारी (22, कुकडसर भद्रेश्वर, कच्छ, गुजरात) व भाराभाई मंगुभाई रबारी (60, झाडवा, ता.लखपत, जि.भूज, गुजरात) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विखरण, ता.शिरपूर येथे गुरुवारी पहाटे 4.55 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

निर्दयतेने वाहतूक : उंटांना झाल्या जखमा
विखरण, ता.शिरपूर नजीक उंटांचा जत्था अत्यंत निर्दयतेने वाहतूक करीत आणला जात असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. यावेळी पशूधन अधिकार्‍यांना बोलावल्यानंतर त्यांनी तपासणी केल्यानंतर उंटांना चारा व पाणी देण्यात न आल्याचे लक्षात आले सतत चालवून आणल्यामुळे त्यांच्या पायांना जखमा झाल्याचेही दिसून आल्याने उंटांची संत तुकाराम महाराज गोशाळा, वरूळ, ता.शिरपूर येथे रवानगी करण्यात आली. कॉन्स्टेबल प्रशांत देविदास पवार यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर, पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, हवालदार ललित पाटील, कैलास वाघ, रवींद्र आखडमल, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, आरीफ तडवी, विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, सचिन वाघ, गोविंद कोळी, मनोज महाजन, कॉन्स्टेबल दादाभाई बोरसे, चालक विजय पाटील, होमगार्ड नाना अहिरे आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !