मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा : आमची वाहने अडवल्यास फडणवीसांच्या दाराबाहेर बसू !
Manoj Jarang’s clear warning : If our vehicles are blocked, we will sit outside Fadnavis’ door! मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता मुंबईतील आंदोलनाची दिशा निश्चित झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सरकारला इशारस दिला आहे. मराठा बांधवांची वाहने अडवल्यास आम्ही फडणवीस यांच्या दाराबाहेर बसू, असे ते म्हणाले आहेत. जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे.
जरांगेंच्या इशार्याने खळबळ
मनोज जरांगे म्हणाले की, ”मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जावे लागणार आहेत त्यामुळे सगळी वाहने बाहेर काढावी लागणार आहेत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहने अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू”, असे जरांगे म्हणाले. वाहने ही गोंधळ करण्यासाठी काढली जाणार नाहीत. त्यात खाण्यापिण्याचे सामान असणार आहे. ज्यांना असे वाटत असेल की आम्ही वाहने आणू नये त्यांनी आमच्या तीन वेळच्या जेवणाची सोय करावी. मग आम्ही वाहने आणणार नाही”, असे जरांगे म्हणाले.


समाजबांधवांना केले आवाहन
दरम्यान, गुरूवारी जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी समाजाला आवाहन करताना ते म्हणाले होते की, पदयात्रेत येणार्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाजबांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे. यासाठी एका वाहनातून मीठ, मिरची, तेल, बाजरी पीठ, गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे. जिथे रस्त्यात थांबाल तेथेच स्वयंपाक करून खायचा आहे.





