यावल तालुका खुनाने हादरला : लग्न जमत नसल्याने पित्याची केली हत्या
पिळोदा गावातील घटना : संशयित मुलाला यावल पोलिसांनी घेतले ताब्यात

Yaval taluka shocked by murder : Father killed as marriage could not work out यावल : लग्न करून देण्यास पिता टाळाटाळ करीत असल्याने या रागातून संतप्त मुलाने पित्याच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून पित्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे रविवार, 14 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत रतनसिंग तानसिंग कोळी (73, पिळोदा) यांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी संशयित देवानंद रतन कोळी (पिळोदा खुर्द, ता.यावल) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लग्न जमवून दिल्याने पित्याची हत्या
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित देवानंद रतन कोळी याचे लग्नाचे वय होवूनही त्याचे लग्न होत नव्हते तर पिता रतनसिंग यांच्याकडे मुलाने लग्न करून देण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता मात्र ते टाळाटाळ करीत असल्याने संतप्त मुलाने रविवारी रात्री 11 वाजता वडिल झोपले असता त्यांच्या डोक्यात कुर्हाडीचे दोन ते तीन घाव घालून त्यांची हत्या केली. आरोपी मुलाविरोधात सुभाबाई रतन कोळी (60, पिळोदा खुर्द) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
