ओझरखेडा धरणानजीक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त
भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : बनावट मद्य सम्राट हादरले
Fake country liquor factory destroyed near Ozarkheda dam भुसावळ : भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओझरखेडा, ता.भुसावळ येथे धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना गुरुवारी रात्री उशिरा उद्ध्वस्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा कारखाना बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती आहे. सुमारे 50 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुजित कपाटे व सहकार्यांनी गुरुवारी रात्री बनावट दारूच्या कारखान्यावर छापेमारी केली. या कारखान्यातील बनावट दारूचा पुरवठा विदर्भात झाल्याची दाट शक्यता आहे.





50 लाखांचा मुद्देमाल जप्त
विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, राजकिरण सोनवणे, एएसआय आय.बी.बाविस्कर, जवान सागर देशमुख, नितीन पाटील, योगेश राठोड, नंदू नन्नवरे यांच्या पथकाने छापा टाकला. यात बनावट देशी दारूसह बाटल्यांना लावायचे बूच, बाटल्या, स्वयंचलित मशिनरी असे सुमारे 50 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
