शिरपूर तालुक्यातील दोघे उपद्रवी हद्दपार
Two troublemakers from Shirpur taluka deported धुळे : शिरपूर शहरातील दोघा उपद्रवींना धुळ्यासह नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कुणाल ऊर्फ आप्पा नंदकुमार पाटील (26) व मोनू ऊर्फ जय शरद पाटील (26) अशी हद्दपार संशयितांची नावे आहेत.
प्रांताधिकार्यांचे आदेश
संशयितांविरोधात शिरपूर शहर पोलिसात यापूर्वी विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत. आगामी निवडणुकांचा काळ पाहता शांतता अबाधीत ठेवण्यासाठी संशयितांना हद्दपार करण्याबाबत प्रसंताव उपविभागीय अधिकार्याकडे दाखल झाला. या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर त्यावर सुनावणी झाल्यानंतर दोघांना तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. संशयितांना मध्य प्रदेशातील सेंधवा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.





