धुळ्यात मारोती ओमनीद्वारे गुटख्याची वाहतूक : लाखाच्या गुटख्यासह संशयित जाळ्यात

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : गुटखा तस्करी पुन्हा ऐरणीवर


Transport of Gutkha by Maroti Omni in Dhule : Suspects netted with Gutkha worth rs one lakh धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मारोती ओमनीतून होणारी गुटख्याची तस्करी रोखत एका संशयिताला बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून एक लाख रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधीत तंबाखू तसेच अडीच लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब (34, तिरंगा चौक, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुटखा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. मारोती व्हॅन एम.एच.18 डब्ल्यू.1152 ही 80 फुटी रोडकडून येताच दिसताच पथकाने वाहन अडवून तिची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणावर विमल गुटखा व सुगंधी तंबाखू आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर, प्रकाश पाटील, संजय पाटील, हवालदार सुरेश भालेराव, संतोष हिरे, रवींद्र माळी, संदीप पाटील, संदीप सरग, चेतन बोरसे, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !