धुळ्यात गुंगी येणार्या औषधांची विक्री : आरोपी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
72 हजारांचा औषध साठा जप्त : मोराणे येथील हॉटेल परिसरात कारवाई
Sale of illegal drugs in Dhule: Accused in Dhule Crime Branch’s net धुळे : धुळे शहरानजीकच्या मोराणे हॉटेल महेंद्र परिसरात मानवी मेंदूवर परीणाम करणार्या गुंगीकारक औषधांची विक्री करण्यासाठी संशयित चारचाकीतून येणार असल्ेयाची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली. डबीर शेख रुफीयोद्दीन शेख (34, पूर्व हुडको, चाळीसगाव रोड, शिफा हॉस्पीटलमागे, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताच्या ताब्यातून 72 हजारा रुपयांचा गुंगीकारक औषधांचा साठा व तीन लाख रुपयांची कार जप्त करण्यात आली.
संशयित येताच आवळल्या मुसक्या
बुधवार, 6 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास मोराणे येथील हॉटेल महेंद्रच्या परिसरात संशयित हुंडाई कंपनीची कार (क्रमांक एम.एच.06 ए.बी. 1983) ने आल्यानंतर कारची झडती घेतली असता वाहनातून 72 हजार रुपये किंमतीच्या गुंगीकारक औषधांच्या 480 सीलबंद बाटल्या व तीन लाखांची कार जप्त करण्यात आली. संशयिताविरोधात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.





यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहा.निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमित माळी, प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश भालेराव, रवीकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोतदार, सुशील शेंडे, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.
