जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : शेत-शिवारातील साहित्य चोरी करणार्‍यास अटक


Performance of Jalgaon Crime Branch : Arrested for stealing material from farm and suburbs
जळगाव :
शेतशिवारातून लोखंडी गेट तसेच कंपाऊडची लोखंडी जाळी असा सुमारे 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला होता. एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार विटनेर गावात तपासाचे चक्रे फिरवित संशयित समाधान अशोक गायकवाड – भील (28, रा.विटनेर) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयितासह मुद्देमाल पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केला.

शेती साहित्याची केली होती चोरी
भरत अभिमान पाटील (34, रा.मावलीनगर खेडी बु.) हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. विटनेर शिवारात शेत गट नं. 58 येथे त्यांनी लोखंडी गेट तसेच कंपाऊंडची जाळी ठेवली होती. चोरट्यानी या मुद्देमालाची चोरी केली. हा प्रकार 28 मार्च रोजी उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान ही चोरी विटनेर येथील समाधन भील याने केल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक नियुक्त करुन ते तपास कामी रवाना केले. पथकाने संशयिताची माहिती काढुन त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल घरा मागच्या खळ्यात ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने 57 हजार रुपये किंमतीचे 200 किलो वजनाचे लोखंडी गेट व 660 किलो वजनाचे जाळीचे लोखंडी तारांचे 11 बंडल जप्त केले. संशयित समाधान भील तसेच चोरीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हवालदार सुनील दामोदरे, पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे, पोलीस नाईक हेमंत पाटील, बबन पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


कॉपी करू नका.