धुळ्यात कापड दुकानातून 55 लाखांची रोकड जप्त

तिघे संशयीत ताब्यात : धुळे गुन्हे शाखेची कामगिरी


55 lakh cash seized from cloth shop in Dhule धुळे : धुळ्यातील आग्रा रोडवरील एका कापड दुकानातून पोलिसांनी सोमवारी सुमारे 55 लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रोकडबाबत संबंधिताला योग्य तो खुलासा करता न आल्याने ही रोकड जप्त करीत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील आग्रा रोडवरील एका कापड कानात सुमारे 55 लाख रुपयांची रोकड आल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या दुकानात जाऊन मोठ्या कापडी पिशवीमधील रोकड जप्त केली. याप्रकरणी कापड दुकानदाराकडून समाधानकारक उत्तरे न मिळत असल्याने ही रोकड जप्त करण्यात आली. संशयित अनिल दुसेजा, राजेंद्र पाटील, नरेंद्र जमादार या दुकान मालकांना ताब्यात घेतले. तपासासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल, अशी माहिती अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !