फैजपूरातील मिल्लत नगरात तीन ठिकाणी धाडसी घरफोडी :सोन्या-चांदीसह तीन लाखांचा ऐवज लंपास


फैजपूर : फैजपूर शहरातील मिलतनगर नगरात चोरट्यांनी दोन घरे फोडत सुमारे तीन लाखांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली. एका घरातून दोन लाख पंधरा हजारांची रोकड लांबवण्यात आली तर दुसर्‍या घरातील एक तोळे सोने व दहा हजाराची चांदी तसेच तीस हजाराची रोकड लांबवण्यात आली.

चोर्‍यांमुळे उडाली खळबळ
फैजपूर शहरातील मिलतनगरातील मलक शरीफ मलक मुसा, रिजवान मलक रशीद व तबारक मुस्तुफा तडवी यांच्या राहते घरात गुरुवार, 23 मे च्या मध्यरात्री घरफोडी झाली. मलक शरीफ मलक मुसा यांच्या घरातून दोन लाख पंधरा हजारांची रोकड व त्यांच्या शेजारील तबारक मुस्तुफा तडवी यांच्या घरातून एक तोळे सोने दहा भार चांदी व 30 हजारांची रोकड तसेच व रिजवान मलक रशिद यांच्या घरातून तीन हजार रुपये लांबवण्यात आले. याबाबत फैजपूर पोलिसांत मलक शरीफ मलक मुसा यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, सहाय्यक फौजदार रशीद तडवी, पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन यांनी भेट देवून पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद तपास करीत आहे. शहरातील वाढत्या चोर्‍यांमुळे रहिवासी धास्तावले आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !