पाटबंधारे विभागाच्या लाचखोर अभियंत्याच्या लॉकरमध्ये सापडले दिड कोटींचे सोने व 12 लाखांची रोकड


बीड : परळी येथील पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर गाळ उपशासाठी शेतकर्‍यांकडून 28 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. एसीबीने केलेल्या तपासणीनंतर सलगरकर याच्या मिरज (जि. सांगली) येथील बँक लॉकरमध्ये दीड कोटींचेे दोन किलो सोने व 11 लाख 89 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल गवसल्याने लाचखोरांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लाचखोराच्या परळीतील भाड्याच्या घरातही 11 लाख 78 हजार रुपयांची रोकड, 30 ग्रॅम सोने आणि 3 किलो 400 ग्रॅम चांदी सापडली होती.

बेशिहेबी मालमत्तेप्रकरणी दाखल होणार गुन्हा
सलगरकरकडे चिंचोटा येथील सात शेतकर्‍यांनी प्रकल्पातील गाळ उपश्याची परवानगी मागितली होती. यासाठी 22 मे रोजी त्याला 28 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. सुमारे दीड लाख रुपये वेतन असलेल्या सलगरकरच्या मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. त्याच्या या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करून दुसरा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

मिरजच्या बँकेत लॉकर
मूळ मिरजचा असलेल्या सलगरकर याचे मिरज येथील बँकेत लॉकर होते. न्यायालयाच्या आदेशानंतर 31 मे रोजी हे लॉकर सलगरकर व पंचांच्या उपस्थितीत उघडले गेले. यात 11 लाख 89 हजारांची रोकड, 1 कोटी 50 लाखांचे 2 किलो 105 ग्रॅम सोने, ज्यात 1 किलो 114 ग्रॅम वजनाचे सोन्याची बिस्किटे आणि 991 ग्रॅम सोन्याचे दागिने मिळून आले.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !