धुळ्यात 25 हजारांचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त : गुन्हे शाखेची कारवाई
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मेंदूला गुंगी आणणार्या औषधांचा तब्बल 25 हजारांचा जप्त केला आहे. अजय राजू कोठारी (33, नंदुरबार) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आणि गोळ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. बसस्थानकाजवळील टॅक्सी स्टॅण्ड परिसरात संशयीत आल्यानंतर त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळील वस्तू तपासल्या असता त्यात 24 हजार 975 रुपये किंमतीचा औषध साठा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित माळी व प्रकाश पाटील, संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रवींद्र माळी, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.