धुळ्यात बनावट मद्य कारखान्यावर गुन्हे शाखेची कारवाई

शंभरावर पोत्यातील भांग सदृश पदार्थ जप्त


Crime branch action against fake liquor factory in Dhule धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे बनावट मद्य कारखानावर शनिवारी छापेामारी करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने यावेळी गोदामातून 100 पोत्यांमध्ये साठवलेला भांगसृदश पदार्थ जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली. देवपुरातील वाडीभोकर रोड परिसरातील एका कॉलनीत बनावट मद्य निर्मित केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली.

कारवाईने उडाली खळबळ
पथकाने 200 लिटर स्पिरिटने भरलेला ड्रम, काही बॉक्समध्ये बनावट मद्याच्या बाटल्या व मद्य करण्यासाठी उपयोगात येणारे साहित्य जप्त केले असून 100 गोण्यांमध्ये भांग सदृश्य पदार्थ आढळल्याने तो जप्त केला तर पथक येताच काही संशयीत पसार झाले. वाल्मीक पाटील नामक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट मद्य व मादक पदार्थ जप्त करण्यात आले. उशीरापर्यंत त्यांची मोजणी सुरू होती.


कॉपी करू नका.