भुसावळात फुटलेल्या पाईप लाईनच्या खड्ड्यात शिवसेनेने लावले बेशर्मीचे झाड

पालिकेचा निषेध : तत्काळ काम न केल्यास आंदोलनाचा इशारा


Shameless tree planted by Shiv Sena in the pit of the broken pipe line in Bhusawal भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ पाईप लाईनला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. वारंवार तक्रारी करुनही पालिका प्रशासनाकडून दुरुस्ती होत नसल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गटाने शनिवारी या पाईप लाईनच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यात बेशरमीचे झाड लावून पालिकेचा निषेध केला.

निषेध आंदोलनाने वेधले लक्ष
भुसावळ शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोर नगरपालिकेची जलवाहिनी फुटल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाने त्या जागेवर बेशर्मीचे झाडे लावून निषेध व्यक्त केला. या निषेध आंदोलनात जोरदार घोषणा देण्यात आल्यात. ही जलवाहिनी तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून फुटलेली असून हजारो लीटर पाणी वाया जात आहे मात्र नगरपालिका अधिकार्‍यांना माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या पाण्याच्या खड्ड्यात पोलीस कर्मचारी, दुचाकी वाहने पडून अपघात होत असतात. येथे दहा दिवसात दुरूस्ती न झाल्यास शिवसेना रस्ता रोको आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक धांडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, उपशहर प्रमुख रहिम गवळी, पिंटू भोई, राकेश खरारे, मनोज पवार, पिंटू भोई, अरुण साळुंके आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


कॉपी करू नका.