धुळ्यात बनावट दारू कारखान्यात सापडला 14 लाखांचा गांजा

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : दोघांविरोधात गुन्हा


Ganja worth 14 lakhs was found in a fake liquor factory in Dhula धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे बनावट मद्य कारखानावर शनिवारी छापेामारी करीत करीत सुमारे 89 हजारांचा बनावट दारू निर्मितीसाठी लागारा मुद्देमाल जप्त केला तर दारू कारखान्याशेजारीच पथकाला सुमारे 14 लाखांचा कोरडा गांजाही आढळल्याने तो जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत दीपक उर्फ हुल्या कापुरे (वाडीभोकर चौक, धुळे) हा त्याच्या घरापासून जवळ असलेल्या त्याच्या ताब्यातील सुशीनाल्यालगत असलेल्या इंदीरानगर भिलाटीमधील जनावरांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात गांजा बाळगून असून बनावट दारूदेखील तयार करीत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर शनिवारी छापेमारी करण्यात आली. यावेळी वाल्मीक अशोक पाटील (40, रा.प्रियदर्शनी नगर, नगाव बारी, देवपूर, धुळे) यास ताब्यात घेण्यात आले तसेच 13 लाख 80 हजार रुपये किंमतीचा सहा हजार 900 किलो गांजा जप्त करण्यात आला तसेच इम्पेरीयल ब्लू बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारा एकूण 89 हजार 25 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दीपक शंकर कापुरे (वाडीभोकर स्टॉपजवळ, देवपुर धुळे) व वाल्मीक अशोक पाटील (40, रा.प्रियदर्शनी नगर, नगाव बारी, देवपूर, धुळे) यांच्याविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, प्रकाश पाटील, योगेश राऊत, अमरजीत मोरे, अमित माळी, दिलीप खोंडे, हेमंत बोरसे, मच्छींद्र पाटील, संदीप पाटील, रवींद्र माळी, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, संतोष हिरे, प्रल्हाद वाघ, सुरेश भालेराव, मायुस सोनवणे, योगेश साळवे, निलेश पोतदार, किशोर पाटील, योगेश जगताप, शीला सुर्यवशी, प्रशांत विजय माळे व चालक कैलास महाजन, संजय सुरसे आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.