वरणगाव ऑर्डनन्समधून एके 47 बंदुकीचे पाच काडतूस चोरणार्या अधिकार्याला बेड्या
सुरक्षा रक्षकांची सतर्कता : चोरी केलेले काडतूस दुचाकीच्या हेड लाईटखाली लपवले

Officer jailed for stealing five rounds of AK 47 from Warangaon Ordnance भुसावळ :बंदुकीचा दारू गोळा बनवण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत एके- 47 बंदुकीत वापरलेले जाणारे पाच जिवंत काडतूस चोरणार्या वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील वरिष्ठ गुणवत्ता हमी स्थापना विभागातील सहाय्यगुणवत्ता आश्वासक विभागाचे कनिष्ठ अभियंत्याला सतर्क सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. संशयीताने चोरी केलेले काडतूस दुचाकीच्या हेड लाईटखाली लपवल्यानंतर या काडतूस जप्त करण्यात आल्या व अधिकार्याला बेड्या ठोकण्यात आल्या. या घटनेने फॅक्टरी प्रशासनात खळबळ उडाली आहे. सतीश जयसिंग इंगळे असे अटकेतील अधिकार्याचे नाव आहे.
असे आहे नेमके प्रकरण
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असलेला सहा.अभियंता सतीश जयसिंग इंगळे याने बुधवार, 26 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडताना दुचाकी (एम.एच.19 ए.टी.1504) च्या हेडलाईटच्या कव्हरमध्ये अॅम्युनेशन 7.62 ची एके 47 शस्त्रात वापरली जाणारे पाच जिवंत काडतूस लपवले. हा प्रकार सुरक्षा रक्षक सी.व्ही.भारंबे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इंगळे यास रोखून धरत हा प्रकार सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांना कळवला. घडल्या प्रकाराची माहिती कार्यप्रबंधक संभाजी सुधाकर पावडे यांनाही कळवण्यात आली.
चोरलेले काडतूस एके 47 चे
वरणगाव आयुध निर्माणीत एके 47 रायफलीत वापरले जाणारे काडतूस तयार केले जाते व 400 रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने फॅक्टरीतील एसक्यूएई विभागाचे ए.ई. सतीष जयसिंग इंगळे याने चोरल्याने याप्रकरणी पॅकींग सेक्शनचे कार्य प्रबंधक संभाजी सुधाकर पावडे (30) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहे.
सीबीआय चौकशी करा : संजय खन्ना
वरणगाव ऑर्डनन्समध्ये घडलेला प्रकार गंभीर असून या प्रकाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी वरणगावचे सामाजिक कार्यकर्ता संजय खन्ना संरक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
