चोरीच्या 18 दुचाकींसह मालेगावसह साक्री तालुक्यातील त्रिकूट जाळ्यात

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : धुळे जिल्ह्यातील सात गुन्हे उघडकीस


A trio in Malegaon along with 18 stolen two-wheelers in Sakri taluka धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरी करणार्‍या त्रिकूटाला अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या नऊ लाख दहा हजार रुपये किंमतीच्या तब्बल 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सात दुचाकी चोरीबाबत धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरीत दुचाकींबाबत अधिक माहिती जाणून घेतली जात आहे. एकनाथ हिरामण सोनवणे (29, अजंग वडेल, ता.मालेगाव), आधार भारत माळी (28, सावतावाडी वडनेर, ता.मालेगाव) व विशाल पंडित अहिरे (22, बल्हाणे, ता.साक्री, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
राजेंद्र रामभाऊ सोनवणे (33, एकवीरा नगर, पिंपळनेर) यांची प्लॅटीना दुचाकी (एम.एच.18 बी.जे.2559) ही शेत-शिवारातून 1 एप्रिल रोजी चोरीला गेली होती. पिंपळनेर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान एकनाथ सोनवणे याच्याबाबत धुळे गुन्हे शाखा निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाईचे आदेश दिले. संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली तसेच अजंग वडेल व बल्हाणे येथे लपवलेल्या तब्बल 18 दुचाकी काढून दिल्या. सात दुचाकी चोरीबाबत धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरीत 11 दुचाकींबाबत आरटीओ प्रशासनाला पत्र देवून त्याबाबत मालकांची खातरजमा केली जात आहे. नाशिकसह मालेगाव भागातून या दुचाकी चोरी करण्यात आल्याचा दाट संशय आहे.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण पारधी, अमरजीत मोरे, अमित माळी, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदीप सरग, संतोष हिरे, संदीप पाटील, मायुस सोनवणे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !