क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास होणार कारवाई

ताप्ती स्कूलच्या बैठकीत वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांचा इशारा


भुसावळ : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये तसेच वाहनातून क ुठल्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ नेण्यात येवू नये, अशा सूचना भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रिक्षा चालकांसह बस चालकांच्या बैठकीत केल्या. शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार संजय भदाणे, वाहतूक पोलीस हेड कॉन्टेबल भाऊसाहेब पाटील, शिरीष झांबरे आदी उपस्थित होते.

वाहनासोबत कागदपत्रे बाळगावेत
हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब पाटील यांनी रिक्षा चालकांना सांगितले की, चालकांनी ड्रेसमध्येच यावे, गाडीचे कागदपत्र सोबत ठेवावे, लायसन्स सोबत ठेवावे तसेच शाळेतील विद्यार्थी ने आण करणार्‍या वाहनात ज्वलनशील पदार्थ नसावे, रिक्षाच्या बाहेर किंवा बसबाहेर विद्यार्थ्यांना हात काढू देऊ नये तसेच विद्यार्थ्यांचे दप्तर हे बाहेर लटकवू नये, सीट बेल्ट लावावे तसेच अधिक विद्यार्थ्यांची कोंबून वहातूक करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर म्हणाल्या की, रिक्षा चालकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळेत आणून घरी सोडावे. विद्यार्थी जर आजारी असल्यास तर त्याला शाळेत आणू नये. सूत्रसंचालन शिरीष झांबरे यांनी तर आभार वाहतूक शाखेचे संजय भदाणे यांनी मानले.


कॉपी करू नका.