नवापूरात ढगफुटी : उधना-नंदुरबार रेल्वे लाईनीत पाणी साचल्याने दहा गाड्यांचे मार्ग बदलले


Cloudburst in Nawapur : Ten trains were diverted due to water logging in Udhna-Nandurbar railway line भुसावळ : नंदुरबारात सुरू असलेला मुसळधार पाऊस व नवापूर शहरात झालेल्या ढगफुटीमुळे शुक्रवार, 26 जुलै रोजी उधना-भुसावळ व भुसावळ-उधना मेमू गाडी रद्द करण्यात आली असून दहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुसळधार पाऊस आणि रेल्वे रूळात व माती, पाणी साचल्याने शुक्रवार, 26 रोजी उधना-नंदुरबार विभागातील चिंचपाडा ते कोळदे स्थानकादरम्यानची रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. यामुळे शुक्रवारी सकाळी भुसावळहून सूरतकडे जाणार्‍या तब्बल 10 रेल्वे गाड्यांचा मार्ग बदल करण्यात आला.

पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणार पाऊस झाल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. भुसावळकडून नंदूरबारकडे जाणार्‍या व सूरतकडून भुसावळकडे येणार्‍या 10 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर पंचाईत झाली आहे. यामुळे प्रवाशांना अनपेक्षित रेल्वे स्थानकांवर उतरण्याची वेळ आली आहे. मार्ग बदल करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 15068 बांद्रा टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी वडोदरा – संत हिरदम नगरमार्गे धावणार आहे. 12833 अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस ही गाडी 26 जुलै रोजी वडोदरा-रतलाम-संत हिरदम नगर-इटारसी-नागपूर मार्गे जाणार आहे. 19483 अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस ही गाडी वडोदरा-रतलाम -संत हिरदम नगर मार्ग वळवण्यात आली. 20824 अजमेर -पुरी सुपर एक्स्प्रेस ही गाडी वडोदरा – रतलाम – संत हिरदम नगर – भोपाळ – इटारसी – नागपूर मार्गे जात आहे. 12656 चेन्नई सेंट्रल -अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मार्ग परिवर्तन भुसावळ – खंडवा – इटारसी – भोपाळ – रतलाम – गोधरा – छायापुरी – आनंद – नडियाद – अहमदाबाद
मार्गे जात आहे. 12834 हावडा – अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी भुसावळ – खंडवा – इटारसी – भोपाळ – रतलाम – गोध्रा – छायापुरी -आनंद – नडियाद, अहमदाबाद या मार्गे वळविली आहे. तसेच 07055 काचीगुडा – हिसार विशेष गाडी भुसावळ,खंडवा, इटारसी,भोपाळ, रतलाम,गोध्रा, छायापुरी, आनंद, नडियाद मार्गे धावत आहे. 22948 भागलपूर – सुरत ताप्तीगंगा एक्स्प्रेस ही गाडी खंडवा, इटारसी,भोपाळ, रतलाम, गोधरा, सुरत मार्गे धावणार आहे. 09045 उधना – पाटणा विशेष ही गाडी वडोदरा,रतलाम, संत हिरडाराम नगर, भोपाळ, इटारसी मार्गे धावत आहे. 20803 विशाखापट्टणम -गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, संत हिरडाराम नगर, रतलाम,गोधरा, छायापुरी,आनंद, अहमदाबादमार्गे वळवण्यात आली.

उधना-भुसावळ-उधना रद्द
उधना भुसावळ मेमू व भुसावळ उधना मेमू या दोन्ही गाड्या शुक्रवारी रद्द करण्यात आल्या दादर-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी व्यारा येथे शॉर्ट टर्मिनेट केली आहे तर भुसावळ-दादर विशेष गाडी ही शुक्रवारी व्यारा येथून सोडण्यात आली.


कॉपी करू नका.