धुळे जिल्ह्यात कोम्बिंग : सहा गावठी कट्ट्यांसह दहा आरोपी जाळ्यात


Combing in Dhule District: Ten accused along with six village kattas in the net धुळे : धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात कोम्बिंग राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी सहा गावठी कट्टे व सहा हत्यारांसह दहा आरोपींना अटक करण्यात आली तर तिघे पसार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

सहा गावठी कट्टे जप्त
गावठी कट्टे बाळगणार्‍या पाच आरोपींकडून सहा गावठी कट्टे व सात जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यात सुरज प्रकाश मार्कंड (26, रा.भाईजी नगर, चितोड रोड, धुळे), काशीफ शेख गुलाब मोहम्मद (21, रा.शंभर फुटीरोड, इब्राहिम मशीदमागे, धुळे), धर्मा दोधू मोरे (29, रा.आरती कॉलनी, देवपूर), सुनील ऊर्फ सनी धर्मा अहिरे (24, रा.नाणे, ता.धुळे) व रवी मोहन सोनी (28, रा.देवझरी कॉलनी, सेंधवा, मध्यप्रदेश) यांच्याकडून हे कट्टे जप्त करण्यात आले.






घातक शस्त्रे जप्त
तलवारी, एक कोयता, चॉपर बाळगणार्‍या तीन रोहित संतोष गवळी (रा. लक्ष्मीनगर, गवळी वाडा, मोगलाई, धुळे), शाहीद शहा जावेद शहा ( वय 19 रा. अशोक नगर, दोंडाईचा) व अजय संदीप सोनवणे (वय 19 रा. म्हाडा वसाहत, मोहाडी उपनगर, धुळे), नाजीम बाली (वय 35 रा.शब्बीर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व गणेश चंद्रकांत गवळी (वय 29 रा. आदर्श कॉलनी, देवपूर धुळे) यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !