रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : डिसेंबरपासून 84 एक्स्प्रेस गाड्यांना लागणार चार जनरल डबे


Important news for you railway passengers: 84 express trains will have four general coaches from December भुसावळ (9 ऑगस्ट 2024) : मध्य रेल्वेने आता प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार 84 मेल/एक्स्प्रेस गाड्यांना चार जनरल डबे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागेसाठीची अडचण आता दूर होार आहे. या गाड्यांना डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यात हे डबे जोडले जाणार आहे.

या गाड्यांना जोडणार प्रत्येकी चार जनरल डब्े
मुंबई-भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्सप्रेस, मुंबई-गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस, मुंबई-अमृतसर मुंबई एक्सप्रेस, मुंबई-अयोध्या छावणी साकेत एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-बलिया कामायनी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-बल्हारशाह एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-छपरा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर गोदान एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-अयोध्या छावणी तुलसी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-अयोध्या छावणी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सुलतानपूर अतिजलद एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-जयनगर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर अतिजलद एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सीतापूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-प्रतापगड एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-आग्रा कँट लष्कर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-राणी कमलापती भोपाळ एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- बनारस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- पाटलीपुत्र एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- शालीमार अतिजलद एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-पुरी एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अमरावती अतिजलद एक्सप्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, पुणे-काझीपेठ एक्सप्रेस, पुणे-लखनऊ एक्सप्रेस, पुणे-जसीदिह एक्सप्रेस, पुणे-लखनऊ एक्सप्रेस.

डिसेंबरपासून लागणार डबे
डिसेंबरच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यापासून या गाड्यांना चार जनरल डबे जोडले जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा जागेचा प्रश्न मिटणार आहे. कनफर्म आरक्षण तिकीट असेल तरच प्रवाशांना गाडीत बसता येणार आहे, असा रेल्वेचा नियम असल्याने प्रवाशांची होत असलेल्या गैरसोईची दखल घेत जादा जनरल डबे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कॉपी करू नका.