धुळ्याजवळ भीषण अपघातात दोन्ही महिला ठार
Both women were killed in a horrific accident near Dhula धुळे (9 ऑगस्ट 2024) : डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. धुळे शहराजवळील चितोड शिवारात हा अपघात घडला. वंदना प्रकाश अहिरे व नर्मदा नथू पवार (रा.वडनेर, ता.मालेगाव, जि.नाशिक) अशी मयतांची नावे आहेत.
दुचाकीस्वार गंभीर
चितोडपासून काही अंतरावर चितोड आणि रावेर बारीचा घाट असून या घाटातून दुचाकी (एम.एच.49 बी.डी. 9607) अनिल अहिरेसह दोन्ही महिला जात असताना भरधाव वाळूच्या डंपरने (एम.एच.20 ई.जी.7267) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. अपघातानंतर डंपरने दुचाकी फरफटत नेल्याने अपघातात वंदना अहिरे आणि नर्मदा पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार अनिल अहिरे देखील जखमी झाला.





