विरुद्ध दिशेने जाणार्‍या ट्रकने केला घात : जळगावात दुचाकीस्वाराचा करुण अंत


Ambushed by a truck going in the opposite direction: Bicyclist dies tragically in Jalgaon जळगाव (11 ऑगस्ट 2024) : जळगावात अपघातांची मालिका कायम आहे. विरुद्ध दिशेने जाणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे योगेश भास्कर ढाके (45, रा. सदोबा नगर, जळगाव) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता राष्ट्रीय महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान झाला. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

दुचाकीस्वाराचा जागीच करुण अंत
जळगाव शहरातील सदोबा नगरातील रहिवासी योगेश ढाके हे नशिराबाद येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होते. शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता काम संपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एम.एच.19 डी.पी.4660) घरी परतत होते. नशिराबादपासून काही अंतरावर आल्यानंतर समोरून राँग साईडने एक ट्रक (क्र. एम.एच.18 बी.जी.2937) नशिराबादकडे जात असताना ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ढाके हे बाजूला फेकले गेले व ते ठार झाले. अपघातानंतर दुचाकी ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांमध्ये अडकली व ती तशीच 50 ते 60 मीटरपर्यंत फरपटक नेली.

नशिराबाद पोलिसांची धाव
अपघातानंतर ट्रक मधोमध थांबला होता त्यामुळे रहदारीलादेखील अडथळा झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, हवालदार शरद भालेराव, गिरीश शिंदे, संजय महाजन, सागर भिडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढाके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. क्रेन बोलवून दुचाकी काढली व ट्रक रस्त्याच्या बाजूला केला. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

 


कॉपी करू नका.