कॉपर केबल चोरट्यांची टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

निजामपूर हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल : एक लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त


Gang of copper cable thieves busted in Dhule Crime Branch’s net धुळे (21 ऑगस्ट 2024) : धुळे गुन्हे शाखेने कॉपर केबल चोरी करणार्‍या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींच्या तब्यातून एक लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे.

या आरोपींना अटक
अबरार अली फत्तु सैय्यद (34, रा.मरकस मशिदजवळ, निजामपूर), योगेश गोरख वाघमोडे, रतन हरी बोरकर, सागर ताथू बोरकर सर्व (रा.वाघापूर ता.साक्री), आदिल अश्पाक तांबोळी (रा.निजामपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहते. आरोपींनी चोरलेली केबल सोलर प्लान्ट परिसरातील काटेरी झुडूपात लपवल्याने ती जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक साक्री-निजामपूर रोडवरील सोलर विद्युत निर्मिती प्लान्ट परिसरात गस्त करताना अबरार अली हाती आला व त्याच्या खोलवर चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितली.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, निजामपूर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, हवालदार दिनेश परदेशी, नाईक रवीकिरण राठोड, कॉन्स्टेबल गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, सुशील शेंडे, सुनील पाटील, राजीव गीते तसेच निजामपूर पोलीस ठाण्याचे हवालदार रतन मोरे, प्रदीप आखाडे, कॉन्स्टेबल परमेश्वर चव्हाण, अर्जुन पवार यांच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !