पाचशे रुपयांची लाच भोवली : तळोदा तहसीलचा लाचखोर पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

रेशन कार्ड बनवून देण्यासाठी स्वीकारली पाचशे रुपयांची लाच ः लाचखोर हादरले


Bribe of five hundred rupees : Taloda tehsil’s supply inspector caught in ACB’s net तळोदा (22 ऑगस्ट 2024) : रेशन कार्ड बनवून देण्यासाठी सुरूवातीला एक हजार व नंतर पाचशे रुपयांची लाच स्वीकारणार्‍या तळोदा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक व व अव्वल कारकून असलेल्या प्रमोद विश्वासराव डोईफोडे (41, शिवण बिल्डींग, महसूल कर्मचारी वसाहत, नंदुरबार) यास नंदुरबार एसीबीने गुरुवारी सायंकाळी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने पुरवठा शाखेतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
46 वर्षीय तक्रारदार यांचे रेशन कार्ड नसल्याने त्यांनी पुरवठा निरीक्षक डोईफोडे यांच्याकडे फॉर्म भरून सादर केला व त्यावेळी दिड हजारांची लाच मागितल्याने एक हजार रुपये देण्यात आले मात्र त्यानंतरही कार्ड देण्यात आले नाही. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्याकडे पाचशे रुपये पुन्हा मागण्यात आले व तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवारी सायंकाळी पाचशे रुपये स्वीकारताच पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात हवालदार विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, नाईक देवराम गावीत, नाईकहेमंत कुमार महाले, नाईक सुभाष पावरा, नाईक नरेंद्र पाटील, नाईक संदीप खंडारे, नाईक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.