पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौर्यावर
Prime Minister Narendra Modi will visit Jalgaon tomorrow जळगाव (24 ऑगस्ट 2024) : जळगावातील लखपती दीदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, 24 रोजी जळगावात येत आहे. जळगावमधील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून दौर्याच्या अनुषंगाने तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट
पीएम मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी रविवार, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणार्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे.





पंतप्रधान दुसर्यांदा महाराष्ट्र दौर्यावर
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. मुंबईतील विविध विकास कामे आणि योजनांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आला होता. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने आता सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुती सरकारकडून योजनांच्या प्रचारावर भर दिला जात असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जळगावमधील कार्यक्रमात काय बोलणार ? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.
